ब्रम्हपुरी नगर पालिकेचा भोंगळ कारभार नियमाला धरुन सभा होत नाही
पत्रकार परिषदेत नगर सेवक मनोज भूपाल यांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ येथील शासकीय विश्राम गृहात माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगर सेवक मनोज भूपाल यांनी पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली. त्यात त्यांनी दि. १७/०२/२०२६ ला सन २०२५-२०२६चे सुधारित व सन२०२६-२०२७ चे अर्थसंकल्पात अंदाज पत्रक सादर करण्यात आले.ते संपूर्ण बजेट ब्रम्हपुरी शहरातील जनतेच्या अपेक्षावर पाणी फेकणारे आहेत आहे,ग्रीन जिम व खेळणी दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तीन लाख दर्शविण्यात आले पण ते कमी असुन त्यामध्ये विस लाख घ्यायला हवे होते,न.प.क्षेत्रातील नाली उपसा करुन सफाई करणे,वाहतुक करणे व इतर स्वच्छता विषयक कामावर खर्च यावेळी दिड करोड घेण्यात आला मागील अर्थसंकल्पात तो एक करोड अडुसष्ट लाख घेण्यात आला होता तर यावेळी कमी का ॽअसा आरोप केला.तसेच आरोग्य विषयक सोई सुविधा,शिबीर साथीचे रोग व इतर आरोग्य विषयक बाबीसाठी या अंदाज पत्रकात पंचवीस लाखाची तरतूद करण्यात आली ती कमी होत असुन त्या ठिकाणी एक करोड ची तरतूद हवी होती.
तसेच मोकळ्या जागेचे सौंदर्यीकरणाबाबत अंदाजपत्रकात शून्य रक्कमेची तरतूद करण्यात आली तर मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात या विषयासाठी एकोनसाठ लाख एकसष्ठ हजाराची तरतूद होती यावेळी का नाही?असाही आरोप त्यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले की,शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामा बाबत यावेळी शून्य रक्कमेची तरतूद केली तर मागील अंदाजपत्रकात याच कामासाठी बाहत्तर लाखाची तरतूद यावेळी का करण्यात आली.असाही आरोप पत्रकार परिषदेत केला.बजेटची सभा घेण्यापूर्वी विविधप्रमुखांशी चर्चा न करता,योग्य नियोजन न करता फक्त काॅपी-पेस्ट बजेट सादर करण्यात आले असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सन २०२६-२७ पासून मालमत्ता कर आकारणीचा दर सुधारित करणे, मालमत्ता दिवाबत्ती कर आकारणी करणे म्हणजे हा न. प. चा नवीन प्रयोग केला तर ब्रम्हपुरी नगरवासींयावरती अतिरिक्त रक्कमेचा भुर्दंड वाढेल हे करणे सध्यातरी योग्य नाही.
मौजा बोंडे गांव येथील परिसरात औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जागा ठेवण्याबाबत विधानसभा निवडणुकीच्यावेळी ब्रम्हपुरी विधानसभेचे मा. आम. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी औद्योगिक क्षेत्रासाठी बोंडे गांव परिसरातील जागा राखीव ठेवून त्या ठिकाणी डी. पी. प्लान मध्ये शब्द दिला होता.पण प्लान तयार नाही.आता आणि मागील वर्षिसुध्दा काँग्रेसची नगर षरिषदेत सत्ता असुन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणजे विकास कामे खंडीत करीत आहे असा आरोप नगर सेवक मनोज भूपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राजीव गांधी सभागृह बि. पी. ल. धारकांना पन्नास टक्के दराने देण्यात यावे,गटर लाइनचे कामे त्वरित थांबवुन सविस्तर आढावासाठी विशेष सभा बोलविण्यात यावी, सभागृहात मुख्याधिकारी, विभाग प्रमुख,नसतांना सभा घेण्यात येते यामुळे ब्रम्हपुरीच्या विकासाला चालना मिळणार नाही.अशी माहिती पत्रकार परिषदेत मनोज भूपाल नगरसेवक यांनी दिली.या पत्रकार परिषदेत भाजपचे पदाधिकारी प्रा.सुयोग बाळबुध्धे, अरविंद नंदुरकर,प्रा.प्रकाश बगमारे,पवन जयस्वाल,प्रा.अशोक सालोटकर,तनय देशकर,राजु भागवत, साकेत भानारकर, अमित रोकडे, स्वप्नील अलदेवे उपस्थित होते.



