ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

५ ब्रास रेती एकावेळी नेण्यास परवानगी द्या

घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाकडे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील वर्षी जिवती तालुक्यातील सुमारे ४० लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास रेतीचे ट्रान्झिट पास वितरित करण्यात आले होते. मात्र जिवती तालुक्यात एकही अधिकृत रेती घाट उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांना कोरपना व राजुरा तालुक्यातील रेती घाटांवरून रेती आणावी लागत आहे.

      सध्या एकावेळी केवळ १ ब्रास रेती ट्रॅक्टरने वाहतूक करण्यास परवानगी असल्याने लाभार्थ्यांना ५ वेळा ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागणार. वाढत्या भाडेदरामुळे हा खर्च परवडणारा नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी आपले ट्रान्झिट पास परत केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिवती तालुक्यासाठी जवळपास १० हजार ब्रास रेतीची आवश्यकता असताना शासनाकडून केवळ २०० ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली होती.

     त्यामुळे मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. या गंभीर समस्येकडे शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जिवती तालुक्यातील ट्रान्झिट पास (टी.पी.) दिलेल्या तसेच देण्यात येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना संबंधित रेती घाटावरून एकावेळी ५ ब्रास रेती हायवा किंवा ट्रकद्वारे वाहतूक करण्यास विशेष परवानगी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक साबने यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महसूल मंत्री,महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये