ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी येथे “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत 27 फेब्रुवारी हा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी डॉ.राजन वानखडे, प्र.प्राचार्य यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खुशतरंग राऊत, आदेश विश्वास आणि वैभव शिलार या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या गौरवाबद्दल मनोगत व्यक्त केले व कविता सादर केल्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषा विभागाची “घेवूया एकच वसा मराठीला बनवूया ज्ञानभाषा” ही मध्यवर्ती संकल्पना समजावून सांगितली.

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व अधिव्याख्याता यांना केले. यावेळी प्रा इंद्रजीत सांगोळे विभाग प्रमुख खणीकर्म, प्रा.विकास चव्हाण जिमखाना सचिव, श्रीमती नयना खानोरकर, ग्रंथपाल यांच्यासह बहुसंख्य अधिव्याख्याता व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार संस्थेचे मराठी भाषा अधिकारी डॉ. नितीन पोटे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये