अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर बनले ८ टि.बी. रूग्णांचे नि:क्षय मित्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर सातत्याने सभोवताली गावाच्या विकासाकडे लक्ष देत असते. सोबतच मनुष्याच्या आरोग्याला महत्त्व देत व जिल्हा टि.बी. अधिकारी चंद्रपुर यांच्या पत्राला मान देत, टि.बी. निर्मुलन करण्याकरिता जन सहभाग अंतर्गत सभोवतालील गावातील एकूण आठ क्षयरोग ग्रंस्त लोकांना दिनांक ७.२.२०२५ ला पौष्टिक आहार किट वितरण करण्यात आले.
अल्ट्राटेक ची ही सलग तीसरी वेळ आहे जी नजिकच्या गावातील टीबी रुग्णांना सहा महिन्यांसाठी पौष्टिक आहार किट देऊन त्यांना टीबी मुक्त होण्यास मदद करीत आहे.
या कार्यक्रमाला क्षयरोग निर्मूलन केंद्राचे अधिकारी – डॉ. स्वपनील टेंभे (तालुका आरोग्य अधिकारी, कोरपना) तसेच डॉ. बबीता नरूला (मुख्य वैद्यकीय अधिकारी, आवारपूर सिमेंट वर्क्स), डॉ. सरला रंगारी (आरोग्य अधिकारी, प्रार्थमिक आरोग्य केंद्र, कवठाळा), चंद्रशेखर पारखी (टि.बी. सुपरवायझर) व सी.एस.आर. विभाग प्रमुख, प्रतीक वानखेडे उपस्थित होते. डॉ. टेंभे यांनी टि.बी.निर्मुलन बध्दल सर्वांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. सर्व रूग्णांना दर माह त्यांच्या उपचार कालावधी प्रमाणे पौष्टिक आहार किट दिल्या जाईल असे आश्वासन श्री. वानखेडे यांनी दिले.