विरंगुळा भवनचे सौंदर्यीकरण करा
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आठवडी बाजार परिसरात असलेल्या विरंगुळा भवन चे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ने नगर परिषद कडे आज 18 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन केली आहे.
विरंगुळा भवन येथे सध्या असलेले तारेचे कुंपण जागोजागी तुटले आहेत त्यामुळे डुकरे, कुत्रे येऊन घाण करत आहेत, याचा त्रास सेवानिवृत्त कर्मचारी, जेष्ठ नागरिकांना होत आहे, तेव्हा पक्की संरक्षण भिंत बांधून परीसरात पेव्हल ब्लॉक बसवून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशा मागणी चे निवेदन देण्यात आले.
मा मुख्याधिकारी नगर परिषद देऊळगाव राजा व नगराध्यक्षांचे वतीने श्री.धनश्रीराम शिपणे यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री.बळीराम मापारी मामा सचिव गोविंदराव बोरकर, के.पी.खांडेभराड अध्यक्ष सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,प्रा.अशोक डोईफोडे,राजुभाऊ खांडेभराड,प्रा.विजयकुमार रायमल, प्रकाश अहिरे, बाबुलाल शिवरकर, दिनक जाधव, रमेश नरोडे, प्रभाकर तिडके, उपस्थित होते.



