स्टेट बँकेने दिले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ
सावित्रीबाई फुले विद्यालयात स्कूल बॅगचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग्स वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कूल बॅग्स मिळाल्या,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले . प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, प्रा. डॉ शरद बेलोरकर, मुख्याध्यापक गाडगे तसेच ज्येष्ठ शिक्षिका गोपमवार उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व.हरीभाऊ डोहे गुरुजी यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्सचे वितरण करण्यात आले.
नवीन बॅग्स मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालय प्रशासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन जीवन आडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन लिलाधर मत्ते यांनी केले
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून, कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



