22 फेब्रुवारी रोजी भावनांच्या लाटा कवितासंग्रहचा प्रकाशन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे संघटक कवी रमेश नरोडे लिखित भावनांच्या लाटा या कवितासंग्रह चा प्रकाशन सोहळा 22 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता विरंगुळा भवन, देऊळगाव राजा येथे आयोजित करण्यात आला आहे.
कविता संग्रह चे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक डॉ प्रकाश शेळके, जालना यांच्या हस्ते होणार आहे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ भगवान खरात, व्यंकटेश महाविद्यालय येथील मराठी विभाग प्रमुख प्रा मधुकर जाधव राहणार आहेत, अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटना चे सचिव गोविंदराव बोरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर शेळके, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड राहणार आहेत.
प्रकाशन सोहळा निमित्ताने कवी संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे, कवी संमेलन च्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यिक ॲड डॉ विजयकुमार कस्तुरे, चिखली राहणार आहेत, कवी संमेलन मध्ये प्रा सुभाष मगर, मेहकर, बबन महामुने, छत्रपती संभाजी नगर, शेख बिस्मिल्ला सोनोशी, सिंदखेड राजा, प्रा मधुकर जाधव, देऊळगाव राजा, जयदीप विघ्ने, प्रा डॉ अरुण आहेर, ॲड वर्षा कंकाळ, सिंदखेड राजा,विजय दळवी,लोणार सहभागी होणार आहे.
तरी या कवितासंग्रह प्रकाशन सोहळा व कवी संमेलन ला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना यांनी केले आहे.



