सावलहिरा येथे महिला भारूड भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्सहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा तालुक्यातील सावलहिरा येथे जय जगन्नाथ बाबा महिला भारुड भजन मंडळ सावलहिरा द्वारा आयोजित महिला भारुड भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक16.2.2026 ला सायं 8.30 वा सौ. अर्चनाताई देवरावदादा भोंगळे याचे हस्ते या भजन स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले.
याच भजन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दिनांक 17 फेब्रुवारी 2026 सायं 6.30 ला प्रमोद कोडापे ता. कोषाध्यक्ष भाजपा तथा जिल्हा महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी याचे अध्यक्षतेखाली पार पडले.
या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी सावलहिराचे माजी सरपंच पुंजाराम जी कोवे,मनोज तुमराम तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी कोरपना,सरपंच उमेश पेंदोर, उपसरपंच प्रशांत जोगी, ग्रां.पं.सदस्य सुनील गेडाम,पो. पाटील सावलहिरा,देविदास पाटील मालेकर, वसंता पा. बहिरे, दिनकर पा. मुसळे,सुधाकर पा. मालेकर, सुधाकर बहिरे, विनोद नागोसे, पवन मुसळे अतुल मुसळे,राजकुमार मुसळे, जगधिश हंसकर, अखिल जोगी, अनिल राऊत, निखिल ताजने आदी उपस्थित होते. प्रथम क्रं. बक्षीस कन्हाळगाव भजन मंडळाने पटकावीला, या कार्यक्रमाचे संचालन उमेशजी पेंदोर यांनी केले, तर आभार पवन मुसळे यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वितेकरिता सर्व सावलहिरा ग्रामस्थांनी सहकार्य केले.



