ताज्या घडामोडी

नव्वणु यात्रा पुर्ण करणाऱ्या तरुण साधकांची जैन समुदायाने काढली भव्य शोभायात्रा

गुंजन चोरडिया, विधी बाफना, ऋत्वा गोलेच्छा, हर्ष गोलेच्छा ह्यांनी 45 दिवस केली खडतर यात्रा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

अत्यंत धार्मिक, शांत व पापभिरू परंतु धार्मिक आस्थांच्या बाबतीत तेव्हढेच सजग असलेला जैन धर्म कठोर धार्मिक अनुष्ठानांसाठी ओळखला जातो. जैन धर्मात करण्यात येणाऱ्या उपासना खडतर असतात व ज्याद्वारे सर्व अनुयायी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवीत असतात. ह्याच धार्मिक अनुष्ठानांत महत्त्वपूर्ण व कठीण समजल्या जाणाऱ्या नव्वानु यात्रेचा समावेश होतो.

गुजरात राज्यातील पलिताना तीर्थ येथे करण्यात येणाऱ्या 45 दिवसीय नव्वानु यात्रेसाठी जैन गुरुदेव खरतरगरचार्य मा. सा. ह्यांच्या प्रेरणाने शतुजय तीर्थ येथे नव्वानु यात्रा करण्यासाठी चंद्रपूर येथिल गुंजन चोरडिया, विधी बाफना, ऋत्वा गोलेच्छा, हर्ष गोलेच्छा ह्या तरुण साधकांनी प्रस्थान केले होते. 45 दिवस खडतर साधना, रोज नित्यक्रमाने मंदिरात पोहचण्यासाठी 18000 पायऱ्यांची चढाई व तेव्हढ्याच पायऱ्या उतरणे असे दिव्य ह्या युवकांनी अत्यंत श्रध्देने पुर्ण केले असुन गुंजन चोरडिया, विधी बाफना, ऋत्वा गोलेच्छा, हर्ष गोलेच्छा स्वगृही परतले.

रेल्वेने चंद्रपूर येथे पोहचताच जैन समाजाच्या वतीने सर्व साधकांचे पुष्पहार घालुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील जैन भवन येथून जैन मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा (बरगोडा) काढण्यात आली. ह्यावेळी जैन शेतांबर मुर्ती पूजक संघाचे अध्यक्ष निर्दोष पुगलीया , स्थानक वासी संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, दीपक पारख, रवींद्र बैद, अशोक बोथरा, पंकज बोथरा, नरेश तालेला, तुषार डगली, देवेंद्र बाठीया, पंकज मुथा, जितेंद्र चोरडिया, राजेश बाफना, राहुल गोलेच्छा देवेंद्र सुराणा, त्रिशूल बंब, जितेन्द्र जोगड, शकुंतला बांठिया, कमलाबाई चोरडिया, वंदना गोलेच्छा, नेहा बैद, सरला बोथरा, वंदना बाफना, अर्चना मूनोत, रश्मी भंडारी ह्यांचेसाह जैन समाजातील गणमान्य लोकांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये