ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विजेचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सध्या घरघुती गॅसचा तुडवडा जाणवत असल्याने स्वयंपाकासाठी अनेकजण इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत आहे. अशातच गणेश आश्रूबा बनसोडे वय 37 रा. देऊळगाव मही वार्ड क्रमांक (1) हा काल दि. 30 मार्च रोजी सोमवारी सायंकाळी घरात असलेल्या इलेक्ट्रिक शेगडीचा वायर जोडत असतांना त्याला विजेचा जबर शॉक लागल्याने या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला.
घरघुती वापरासाठी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर हा घातकचं असल्याने यासाठी आता काळजी घेणे महत्वाचे आहे. गणेश बनसोडे यांच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा आप्त परिवार आहे.



