ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील खंडोबा टेकडीवरील जैन धर्मगुरू समाधीस्थळी विविध विकास कामांचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहराच्या उत्तरेस असलेल्या खंडोबा टेकडी स्थित दिगंबर जैन धर्मियांचे धर्मगुरू यांच्या पुरातन समाध्या आहेत या ठिकाणी समाध्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने गत दोन वर्षांपूर्वी शासनाने संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर यावर्षी या समाजाचे वतीने या विभागाचे आमदार मनोज कायंदे यांच्याकडे निवेदन देऊन उपलब्ध जागेत विविध विकास कामे करून देण्याची मागणी केली जागेची उपलब्धता पाहून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी 60 लक्ष रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर दिनांक 31 मार्च 26 रोजी या ठिकाणी आमदार मनोज कायदे यांच्या हस्ते भूमिपूजन करून काम सुरू करण्याचा श्री गणेशा करण्यात आला यावेळी न.प.चे पदाधिकारी व बहुसंख्य जैन समाजातील नागरिक उपस्थित होते.

 याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर योजना) अंतर्गत नगर परिषदेस सर्वे क्रमांक सहा मध्ये जैन धर्मगुरू समाधी स्थळी विविध विकास कामे करण्याकरता 60 लक्ष रुपये आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नांती जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी मंजूर केले त्यामध्ये उपलब्ध जागेत जैन समाजातील समाज बांधवांच्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साठी सभागृहाचे बांधकाम दिगंबर जैन मुनी यांच्या विश्रांतीसाठी त्यागी भवनचे बांधकाम चा समावेश आहे.

दिनांक 31 मार्च 26 रोजी या कामाचे भूमिपूजन आमदार म्हणून कायदे व जैन समाजाचे जेष्ठ श्रावक माजी नगराध्यक्ष शांतीलाल सिंगलकर यांच्या हस्ते करण्यात आले व या विकास कामाचा श्री गणेशा करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष माधुरी शिपणे, उपाध्यक्ष वनिता भुतडा ,गटनेते प्रदीप वाघ, बांधकाम समिती सभापती विष्णू झोरे, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता धनशिराम शिपने, डॉ.गणेश मांटे, निशिकांत भावसार, विकास कासारे, राजेश भुतडा ,माजी नगर अध्यक्ष गोविन्द झोरे,संतोष खांडेभराड ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेजुळकर, प्रकाश गीते, प्रा. सदाशिव मुंढे ,पवन डोईफोडे, गोविंद तिडके, अफरोज खान बाबा, मुख्याधिकारी अरुण मोकळ,प्रवीण धन्नावत, संदीप शिंदे, शुभम कायंदे(स्विय सहाय्यक)अनिल सावजी, अतिश खवडे, रविंद्र खडकपूरकर, मुकेश सिंगलकर, प्रियदर्शन जिंतूरकर, उल्हास वाटाणे, मयूर जैन कवीश जिंतूरकर, योगेश खडकपूरकर, सुबोध मिश्रीकोटकर, दिलीप वाटाणे, मनीष कोठेकर, विकास जिंतूरकर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये