ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी केशव गिरमाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीच्या अशासकीय अध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी यांची निवड नुकतीच पालकमंत्री यांनी केली आहे. जिवती तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य केलेली व्यक्ती म्हणून केशव गिरमाजी यांची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारीनुसार ही निवड झाली आहे.

राज्यात सेना भाजप सरकार आल्यानंतर पालकमंत्री यांचे शिफारशी नुसार तालुका स्तरावरील सर्व संजय गांधी निराधार योजना समित्या पुनर्गठीत करण्यात येत आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून केशव गिरमाजी यांचे अभिनंदन होत आहे. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशीने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली असून या संधीच मी सोनं करेन, तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थी या योजनेचा लाभार्थी होईल यासाठी सर्व समिती सदस्यांना सोबत घेऊन प्रामाणिक काम करणार असल्याचा विश्वास केशव गिरमाजी यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये