क्रीडा स्पर्धेत पालडोह शाळेचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ही चंद्रपूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण ३६५ दिवस चालणारी शाळा आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धेमध्ये पालडोह शाळेतील वयोगट १४ व वयोगट १७ मुला मुलींनी या क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
सांघिक खेळ कबड्डी व खो-खो या स्पर्धेमध्ये पालडोह शाळेतील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १४ वयोगटातील मुलींनी तालुकास्तरावर कबड्डी या खेळात प्रथम क्रमांक पटकावला तर वयोगट १४ मुले व मुली यांनी खो-खो या सामन्यात प्रथम क्रमांक मिळवला. वयोगट १७ मुली व मुली यांनी खो-खो या अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक पटकावला.
अशा पद्धतीने तालुकास्तरीय सांघिक खेळात एकूण पाच सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह यांनी तालुकास्तरीय झालेल्या खेळामध्ये आपलं अधिपत्य गाजवत खो-खो मध्ये चारही सामन्यात प्रथम क्रमांक मिळवत अलौकिक कामगिरी या शाळेतील मुलांनी केली.
विदर्भ महाविद्यालय जिवती तेथे पार पडलेल्या सामन्याचे कौतुक समस्त शालेय व्यवस्थापन समिती ने केले.सोबतच सर्व पालक यांनी सुद्धा मुलांचे अभिनंदन केले.जिवती येथे पार पडलेल्या सामन्याची जबाबदारी राठोड सर यांनी पार पाडली.
सामन्याचे प्रमुख मार्गदर्शक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, खवशी,गाकरे,आडे, इंझलकर, धुळगुंडे, बोवाडे, चव्हाण यांनी सुद्धा विजेत्या चमूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.