सिनगाव जहागीर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथून जवळच असलेल्या सिनगाव जहागीर येथे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यशाळा संपन्न झाली.
अध्यक्ष स्थानी सरपंच सुनीता डोईफोडे होत्या,स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्यासाठी घेतलेल्या कार्यशाळेत ग्रामस्थांनी स्पर्धेत उतरण्याचा निर्धार केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान च्या माध्यमातून आठ मुख्यघटक राबविण्यात येणार असून त्या साठी स्पर्धा ठेवण्यात आली असून बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आली आहे, ग्रामपंचायत ला पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय, राज्यस्तरीय असे निकषांवर बक्षिसे मिळणार आहे हाच उद्देश ठेवून सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत या कालावधीत ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी व प्रमुख घटकात प्रवाहित असलेल्या व्यक्तींना कार्यशाळेच्या माध्यमातून
ग्रामविकास अधिकारी बी डी मांटे यांनी लोकसहभागातून लोकचळवळ केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान चे महत्व समजून सांगितले
या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्पर्धेत उतरून यशस्वी होण्याचा निर्धार केला आहे यावेळी पंचायत समिती बांधकाम चे कनिष्ठ अभियंता आर यु शेवाळे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.