जिवतीत सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, बौद्धाचार्य पदाचे जनक, आणि चैत्यभूमीचे संस्थापक सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी, जिवती यांच्या वतीने श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. पंचशील बुद्ध विहार येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे शहर उपाध्यक्ष नभिलास भगत होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दिपक साबने, तालुका सरचिटणीस प्रा. चंदू रोकडे, शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे, शहर सरचिटणीस शरद वाटोरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बालाजी सोनकांबळे, किर्लोस गायकवाड, रामदास रणवीर, तालुका कोषाध्यक्ष बळीराम काळे, सचिव प्रशांत कांबळे (संरक्षण विभाग) आणि शुद्धोधन निखाडे (संस्कार विभाग) सचिव प्रदीप काळे (पर्यटन विभाग), कल्याण सरोदे, संघपाल जीवने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक दिपक साबने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. चंदू रोकडे यांनी तर आभारप्रदर्शन शरद वाटोरे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या परंपरेनुसार सामूहिक सरणत्य घेऊन करण्यात आला.