बी.आय.टी. ड्रामा क्लबने रंगवली शिक्षण आणि नाटकाची सांगड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बल्लारपूर :_ शुक्रवारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी बी.आय.टी. ड्रामा क्लबच्या विद्यार्थ्यांनी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बल्लारपूरचा प्रांगणात एक विचारप्रवर्तक पथनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन ड्रामा शिक्षक प्रा. अनिकेत परसावार यांनी केले असून, नाटकाचे केंद्रबिंदू होते थिएटर फक्त रंगभूमी नाही, तर जीवनाची खरी शाळा आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय वासाडे सर, रजनीकांत सर, लीना पोटदुखे मॅडम आणि बी.आय.टी. ड्रामा क्लबच्या पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनी केलं. पथनाट्याची सुरुवात विद्यार्थ्यांच्या दमदार घोषणांनी झाली. या विनोदी आणि ज्ञानप्रद संवादांनी भरलेल्या नाटकात विद्यार्थ्यांनी दाखवले की शिक्षण केवळ पुस्तकी न राहता आत्मविश्वास, संवाद आणि टीमवर्क यांच्याशी जोडले गेले पाहिजे. पथनाट्यात आचार्य भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्रातील आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनय यांसारख्या नाट्यशास्त्रीय तत्त्वांचा हलक्याफुलक्या विनोदातून प्रभावी उपयोग करण्यात आला. थिएटर म्हणजे केवळ करमणूक नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया आहे. नाटकाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी एकमुखाने घोषणा दिली.
या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि उपस्थित शिक्षक, विद्यार्थी यांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. बी.आय.टी. ड्रामा क्लब हा केवळ एक क्लब नाही, तर तांत्रिक विचारांना सर्जनशीलतेची जोड देणारे व्यासपीठ बनला आहे. आजच्या प्रयोगाने ते पुन्हा सिद्ध झाले.