ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिमेंट रस्ता बांधकामात नियमांना तिलांजली !

प्रशानाचे दुर्लक्ष अन् कंञादाराची मुजोरी ; चौकशी करून अंदाजपत्रकानुसार काम करण्याची स्थानिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- कुठल्याही शासकीय योजनेच्या कामावर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाल्यास कंञाटदार शासनाच्या करोडो रूपयांच्या निधीचा कसा पध्दतशिरपणे विल्हेवाट लावून मोकळे होतात.याचा प्रत्यक्ष उदाहरण दै.पुण्यनगरीने कंञाटदाराच्या कामाचा भांडाफोड करून नियमबाह्य सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणातील धकादायक प्रकार उघडकीश आणले आहे.शासनाच्या वतीने जिवती तालुक्यात करोडो रुपयांची जनहिताची कामे करण्यासाठी इ-टेंडर पद्धतीने रस्त्याची व पुलांची कामे योग्य कंत्राटदाराला देऊन जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून दर्जेदार काम झाले पाहिजे हीच भूमिका ठेऊन पुणे येथील आर. के. सिंग कॅट्रक्टशन कंपनीला जिवती तालुक्यातील गडचांदूर, पाटण ते परमडोली या मार्गावरील पुलांचे व रस्त्याचे विकास कामे सुरू आहेत.सदर कामे सुरू असताना प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसतानाही हि कामे केली जात असुन संबंधित विभाग याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करित असल्यानेच कामे निकृष्ट दर्जाचे करून कंञादार मोकळे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनाकडून होत आहे.
भोयगाव-पाटण-परमडोली राज्यमार्ग जिवती शहरातून जात आहे.आणि कामही सुरू आहे खरे तर हे काम पावसाळ्यापुर्वीच करायला पाहिजे होती माञ कंञाटदाराच्या दिरंगाईमुळे हि कामे भर पावसातच केली जात आहे.रस्ता शहरातून जात असल्याने रस्त्याचे खोदकाम करून काँक्रिटकरण केले जात आहे.रस्ता खोदकाम केल्यानंतर सदर खोदकाम केलेली माती तपासणी करूनच काम योग्य पध्दतीने करायला पाहिजे होती.मातीची तपासणी केली किंवा नाही याबाबत शंकाच आहे जर तपासणी केली आहे तर मग मुरमाचा सब ग्रेड न देता चिकलातच जिएसबीचा थर व बेड का केले जात आहे.जीएसबिचा थरही नियमानुसार होत नसल्याचा आरोप होत असुन सदर कामाची चौकशी करून चिकलात केलेली जीएसबी उकरून मुरुमाचा थर दिल्यानंतरच जिएसबीचा थर देऊन कामे करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

   रस्त्याचे काम दर्जेदार कसे होणार?

गाव-खेड्यातील नागरिकांना रस्ते सुरळीत व दर्जेदार व्हावे यासाठी प्रशासनाचा अधिकारी नेमला जातो.आणि संपूर्ण कामे त्या प्रशासनाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे जेणेकरून शासन खर्च करित असलेली कोट्यावधी रूपयांचा निधी पाण्यात न जाता दर्जेदार कामे झाली पाहिजे हि शासनाची भुमिका असते माञ असे कधीही होत नाही.आणि यासाठी जिवती तालुका तर अपवाद आहे.तालुक्यातील कुठलेही काम अधिकाऱ्यांच्या देखरेखी झाली नाहीत.अधिकारी उपस्थित नसतानाही हि करोडोची कामे कंञाटदाराच्या भरोश्यावर केली जाते मग हि कामे खरच गुणवत्ताधारक व दर्जेदार होत असतील काय?यावर शासन प्रशासनाने चिंतन करण्याची गरज आहे.

       पावसाळा सुरू झाल्याने शहरातील रस्त्याचे काम तातडीने करणे आवश्यक होते.सदर कामावर खोदकाम करून मातीची तपासणी केली त्याचा सिबीआर १० च्या जवळपास आहे त्यामुळे मुरूमाचा सबग्रेड न देता जिएसबीचा थर दिला असुन मुरूमाचा सबग्रेड देण्याची आवश्यकता नाही
– आकाश बाजारे
उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग गडचांदूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये