पासष्टवा शाळा स्थापना दिन व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
जिल्हा परिषद शाळा,कसरगट्टा येथे आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कसरगट्टा येथे शाळेच्या पासष्टव्या शाळास्थापना दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दि.१ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक जनता विद्यालयचे प्राचार्य अमरसिंह बघेल यांची तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश कुळमेथे, सह-उद्घाटक सरपंच वर्षा पिपरे, प्रमुख अतिथी पोलीस पाटील नानाजी धोडरे,देवराव टेकाम,संदीप गव्हारे,समता परिषदचे तालुका अध्यक्ष भुजंग ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आधुनिक शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांबरोबरच पालक व गावकऱ्यांचीही तितकीच जबाबदारी असल्याचे सांगितले. मोबाईलचा अतिरेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घातक ठरत असून, यावर पालकांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन प्राचार्य अमरसिंह बघेल यांनी उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शनातून केले.यावेळी भुजंग ढोले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल यासाठी शाळेला स्पीकर संच भेट दिली तर कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर तथा गावकरी मंडळी यांच्या सहकार्यातून शाळा सुधार फंडा करिता ६८,३५० रुपये देणगी स्वरुपात शाळेला मदत करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद बाविस्कर यांनी तर आभार जयश्री धांडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी करिता मुख्याध्यापक भोलेनाथ कोवे तथा शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



