पद्यशाली समाजातर्फे मार्कंडेय जयंती महोत्सव
महोत्सवात डॉ. बंडुआकनुरवार, रामभाऊ मल्लेलवार, अजय शिप्पावार यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वरोरा तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडेय ऋषींचा जन्मोत्सव स्थानिक भडगरे यांच्या शिवमंदिरात उत्साहात साजरा करुन समाजाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजबांधवाचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक यशवंतराव आगबत्तनवार होते.प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय पद्मशाली महासभा सदस्य शंंकर दिगदेवतुलवार,आंनदराव बोडूवार,राजाराम चिल्कावार, पुरुषोत्तम येनगंदलवार,योगेश बेतवार,संदिप येनगंदेवार,भाऊराव कुंटेवार,प्रकाशकामनवार,सपनायेनगंदेवार,सत्कारमुतीॅ जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना,अध्यक्ष डाॅ.बंडूभाऊ आकनुरवार,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मल्लेलवार,सिव्हील अभियंता अजय शिप्पावार होते.प्रांरभी हवनसह श्री मार्कंडेय ऋषींच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.यानंतर पद्मशाली समाजातील मान्यवरांचा त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल व योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाजाचे तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना अध्यक्ष डॉ.बंडूभाऊ आकनुरवार यांचा भरीव सामाजिक व संघटनात्मक कार्याबद्दल,निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ मल्लेलवार व सिव्हिल अभियंता अजय शिप्पावार यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. बंडूभाऊ आकनूरवार यांनी समाज संघटन,जागृती व समाजाला एकजुट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.महीलाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शंकर दिगदेवतुलवार यांनी केले.आभार सोनल येनगंदलवार यांनी केले.यशस्वीतेसाठी आनंदराव बोडूवार,राजाराम चिलकावार, शंकर दिगदेवतुलवार, पुरुषोत्तमजी येनगंदलवार,सुरेश आगबत्तनवार, संदीप येनगंदेवार,योगेश बेतवार, सौ सपना येनगंदेवार, सौ. पूजा येनगंदलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.महाप्रसादाने मार्कंडेय जन्मोत्सवाची सांगता झाली.



