भद्रावतीत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती, भद्रावती यांच्या वतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन शनिवार, दि. ३१ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हा महोत्सव संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर, दरबान सोसायटी, भद्रावती येथे संपन्न होणार आहे.
या जयंती महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना होणार असून दुपारी १२ वाजता महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता रांगोळी स्पर्धा तर सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आरती होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता मान्यवर पाहुण्यांचे आगमन होणार असून सकाळी ११ वाजता आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष प्रफुल चटकी तसेच शिवसेना (शिंदे) लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पाहुण्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष, रामकृष्ण मेंढे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी संविधान अभ्यासक ॲड.भूपेंद्र रायपुरे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संबा वाघमारे राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास भसाशंकर व अजय लिहीतकर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भटवलकर व माजी नगराध्यक्षा सुनीता वरटकर यांची उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी ४ वाजल्यापासून आगंतुकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत मुडे,सचिव अतुल खंडळे,महादेव कोल्हे, प्रकाश मेंढे यांच्यासह सतीश लांडगे, विजय येरेकर, प्रदीप खंडाळे,लता खोले, संध्या धुळे, सतीश इंगोले, मिलिंद खोब्रागडे, विजय गायकवाड आदी सदस्य परिश्रम घेत आहेत. उत्सव समितीच्या वतीने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



