संत. श्री. जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन
संताजी स्नेही मंडळ भद्रावती तर्फे भव्य शोभायात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील संताजी स्नेही मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत श्री. जगनाडे महाराज जयंती निमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २५ रोज रविवारला सकाळी १०.०० वाजता घटस्थापना व मूर्ती पूजन होऊन दुपारी १२.०० वाजता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, सायंकाळी ४.००वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, ६.००वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर ७.००सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता होईल. भव्य शोभायात्रेचे उद्घाटनज्योती चौधरी (गायकवाड)सौरक्षण अधिकारी भद्रावती यांचे हस्ते तर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी, लेखिका व रेडिओ आर्टिस्ट केशिनी हटवार, व प्रमुख अतिथी प्राचार्य सुधीर मोते राहणार असून विशेष पाहुणे म्हणून आयुध निर्माणि चे अपर महाप्रबंधक दिगांबर उरकुडे,उपमहाप्रबंधक प्रशांत सूरकार, किरण धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच एरंडल तेली समाज अध्यक्ष बाबाराव तराळे यांची उपस्थिती राहील. सर्व भद्रावती कर व समाज बांधवांनी या कार्यक्रमास सहकार्य करून लाभ घ्यावे असे आवाहन अध्यक्ष पुरूषोत्तम नैताम, तर महिला कार्यकारिणी अध्यक्षा अनिता आष्टनकर यांनी केले आहे.



