ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन चिमुकल्यांच्या आईला मिळाले नवे जीवन…

श्री. तनय देशकर यांची माणुसकी पुन्हा जिंकली मनीषा भोयर यांच्या व्हृदयाची मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ हळदा येथील दोन लहान मुलींच्या आई मनिषा रविंद्र भोयर यांचे हृदयाच्या वॉल्वचे अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. तनय दादा देशकर यांच्या पुढाकाराने पूर्णपणे मोफत करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे एका आईचा जीव वाचला असून एका कुटुंबाचा संसार पुन्हा उभा राहिला आहे.

मनिषा भोयर यांना हृदयाच्या वॉल्वचा गंभीर आजार असून तातडीने वॉल्व बदलण्याची आवश्यकता होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने उपचारांचा खर्च परवडणारा नव्हता. मनीषा भोयर यांचे पती रविंद्र भोयर हे ड्राइवर चे काम करतात. पत्नी मनीषा यांच्या या आजाराबाबत हळदा येथील श्री. अक्षय जरूरकर यांना सांगितले असता श्री. जरुरकर यांनी भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. तनय दादा देशकर यांना संपर्क केला. अशा कठीण आणि निराशाजनक परिस्थितीत श्री. तनय दादा देशकर यांनी तात्काळ संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत मदतीसाठी पुढाकार घेतला. पुढील उपचारांसाठी मनीषा भोयर यांना तत्काळ नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.

त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने नागपूर येथील आशा हॉस्पिटल मध्ये मनिषा भोयर यांचे हृदयाच्या वॉल्वचे शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. अनुभवी डॉक्टरांच्या चमूने केलेल्या या ऑपरेशननंतर मनिषा भोयर यांची प्रकृतीने स्थिर असून, त्या आपल्या हळदा येथे आहेत.

राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी असते, याचे जिवंत उदाहरण श्री. तनय दादा देशकर यांनी पुन्हा एकदा दिले आहे. गरजू रुग्णांसाठी धावून जाणे, उपचारासाठी प्रयत्न करणे आणि प्रत्यक्ष मदत करून जीवन वाचवणे, हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे अनुभव नेहमीच ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेला मिळत असतात.

या कार्यामुळे परिसरातील नागरिक, कुटुंबीय तसेच विविध सामाजिक स्तरातून तनय दादा देशकर यांच्या कामाचे कौतुक होत असून “सेवेचं राजकारण” ही त्यांची ओळख अधिक ठळक होत आहे. श्री. तनय दादा देशकर यांच्या पुढाकाराने आज एका आईच्या हृदयाला नवा ठोका मिळाला असून त्यांच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये