जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची अवैध दारु विक्रेते यांचे विरुध्द बेधडक मोहीम
अवैध हातभट्टी दारु विक्रेत्यास एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत अमरावती कारागृहात रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेलु, जि. वर्धा अंतर्गत मौजा शिखबेडा, केळझर परिसरात अवैधरित्या हातभट्टीची गावठी मोहा फुला पासुन निर्मीत दारु विक्री करणारा इसम नामे लखनसिंग छोटुसिंग बावरी, वय ४५ वर्ष राह. शिखबेडा, केळझर ता. सेलु जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, सेलु जि. वर्धा येथे सन २०२३ ते २०२५ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत एकुण १८ गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्द इसमाविरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहु स्थानबध्द इसम हा नजुमानता अवैधरीत्या गावठी मोहा फुलाच्या हातभट्टीच्या दारुची विक्री करीत होता. ज्यामुळे पोलीस स्टेशन, सेलु अंतर्गत येत असलेल्या केळझर परिसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन, सेलु परिक्षेत्रातील केळझर तसेच आजु बाजुचे खेडे गावातील मोठया प्रमाणात मद्दपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलींना खुप त्रास वाढत चालला होता.
तत्कालीन ठाणे प्रभारी अधिकारी पो.नि. / मनोज गभणे, यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव तत्कालीन मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी. यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
आगामी येणारे सण उत्सव व निवडणुक शांतता पुर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर, तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहेत.
सन २०२५ साली आज पावेतो एकुण १८ दारु विक्रते, गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जैल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२६ वर्षाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत ही प्रथम कार्यवाही आहे. अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती व रेती माफीयांवर कठोर कार्यवाही करण्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले आहे.
मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे बेधडक मोहीमेमुळे अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती तसेच रेती माफीया मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, उप विभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पोनी/विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा / आशिष महेशगौरी, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, तत्कालीन पो.नि./मनोज गभणे, पोलीस अंमलदार/ज्ञानदेव वनवे पोलीस स्टेशन, सेलु यांनी केली आहे.



