ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडपेठ येथे भाजपातर्फे महिला सन्मान व मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे भारतीय जनता पार्टी घोडपेठ–कोंढा मंडळाच्या वतीने महिला सन्मान व मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्नेहसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम बुधवारी किसान भवन, घोडपेठ येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वेदांती करण देवतळे होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती- वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला भद्रावती तालुका भाजपा ग्रामीण अध्यक्ष शामसुंदर उरकुडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष वंदना शेंडे, विधानसभा संघटक किशोर बावणे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री लक्ष्मी सागर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रक्षिता निरंजणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिला पारखी, माजी सरपंच विमल विश्वनाथ निमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात महिलांचा हळदी-कुंकू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी संघटनात्मक बळ वाढवण्याचे आवाहन केले. महिलांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय सहभाग वाढवणे हेच उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा भद्रावती ग्रामीण तालुकाध्यक्ष शामसुंदर उरकुडे, संचालन माजी सरपंच वैशाली उरकुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रक्षिता निरंजणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घोडपेठ कोंढा मंडळातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये