शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव व अपयशी धोरणांविरोधात जिवती काँग्रेसचे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनता सध्या महागाई, बेरोजगारी, अपूर्ण विकासकामे आणि सरकारच्या अपयशी धोरणांमुळे मोठ्या संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नसून उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी जिवती येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने व मित्र पक्षांच्या सहकार्याने,जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वात ‘शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना पाठविण्यात आले.
यावेळी मोर्चामध्ये आदिवासी व गैर आदिवासी पट्टेधारकांना नोटीस पाठवून त्यांचे पट्टे रद्द केल्याचे आदेश तहसीलदार मार्फत दिले आहेत ते तात्काळ स्थगिती करणे, सातबारावर वारसांन चढवणे, कुमारी अनुष्का किरण पाटोळे या विद्यार्थिनीची एसआयटीमार्फत चौकशी करणे, हरिभाऊ राठोड यांना अपमानास्पद बोलल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा घेणे, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना जन्म दाखल्याची अट रद्द करणे, मीटर बिलाची वाढ रद्द करणे, मनरेगा योजनेत बदल करण्यात येऊ नये,शेतमालाला हमीभाव लागू करणे, कर्जमाफीची अंमलबजावणी, वाढती महागाई रोखणे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, जलजीवन मिशनसह विविध विकासकामांतील अपयशाची चौकशी, तसेच जनविरोधी निर्णय मागे घेण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
राज्य सरकारने शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने हा जनआक्रोश उफाळून आला असून मोर्चेकऱ्यांच्या मागण्या तातडीने न सोडविल्यास जनआक्रोश उफाळून येईल व याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, प्रा. सुग्रीव गोतावळे, गणपत आडे, भीमराव महाराज राठोड, शंतनु धोटे, बालाजी सोनकांबळे, सुदाम राठोड, अमर राठोड, भीमराव पाटील मडावी, रमेश जाधव, विजयकुमार कांबळे, तिरुपती पोले, अमोल कांबळे, सिताराम मडावी, माधव डोईफोडे, शेंबडे मामा, प्रदीप काळे, बंडू राठोड, भारत साबणे, ताजुद्दीन शेख, रामदास रणवीर, मारुती मोरे, परमेश्वर केसरे,विजय राठोड, नामदेव जुमनाके,लक्ष्मण कोडापे, बाजीराव वलका, भोजू पाटील आत्राम, दत्ता तोगरे,दत्ता गायकवाड, सुरेश कोडापे, लक्ष्मण कांबळे, शब्बीर मामू, सोपान शिकारे, तांबरे मामा, जब्बार शेख, सुधाकर नागोसे, घुले, नंदा मुसने,सुषमा मडावी,चव्हाण ताई, जयश्री गोतावळे, अनिता गोतावळे, कराळे ताई यासह जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.



