पोलीस मुख्यालय येथे विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस कर्मचारी संस्था व पोलीस बॉइज क्लब तर्फे दि: १६ ते १८ जानेवारी दरम्यान विदर्भस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे उद्धघाटन मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल यांचे हस्ते झाले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री आर. के. शर्मा, एच.आर. हेड एवोनीथ स्टील, श्री विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसेच श्री मजीद बशीर शेख राखीव पोलीस निरीक्षक वर्धा हे उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नांदेड, पुलगाव येथून एकूण १२ संघांनी आपला प्रवेश नोंदविलेले होता. स्पर्धेचा अंतिम सामन्यात डी. सी. सी अमरावती संघाने विजन स्पोर्ट्स नागपूर संघाला ९१-७९ गुणाने पराभूत करून विजेते पदाचा मान पटकविला. नेक्सस अकॅडेमी नांदेड ने हूपर्स नागपूर संघाला पराभूत करून तृतीय स्थान प्राप्त केले. विजेत्या, उपविजेत्या व तृतीय संघाला रोख रक्कम व चषक आयोजकांमर्फत देण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. शत्रुघ्न गोखले, महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे श्री. जयंत देशमुख, उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये प्रथमच डिजिटल स्कोर बोर्ड व डिजिटल गुणपत्रीकेचा वापर करण्यात आला. सदर स्पर्धा उत्तम रित्या यशस्वी करण्याकरिता राजेश उमरे, राकेश महेश्वरी, प्रशांत काळे, नितीन नेटके, किशोर पाटील व इतर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



