दक्ष शिवरकर ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत मेरीट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,मुंबई द्वारा सप्टेंबर 2025 मध्ये ओ.एफ.चांदा हायस्कूल केंद्रातून घेण्यात आलेल्या एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत येथील साईप्रकाश कला अकादमीचा विद्यार्थी ‘दक्ष नितीन शिवरकर’ यांने मेरिट यादीमध्ये येण्याचा मान मिळविला. तो गत चार वर्षांपासून कला अकादमी मध्ये चित्रकलेचे धडे गिरवीत आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साईप्रकाश कला अकादमीचा एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून या दोन्ही परीक्षांत एकूण 38 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.’.अ ‘ श्रेणीमध्ये 21′ ब’ श्रेणीमध्ये मध्ये 15 तर’ क’ श्रेणीमध्ये 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .या यशाचे श्रेय विद्यार्थी व पालक अकादमीचे प्रशिक्षक विनोद ठमके व क्षितिज शिवरकर यांना देत आहेत.


