केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाचा स्नेह मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ (CBWAI) यांचा तृतीय वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी स्थानिक श्री शिंदे मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास सुमारे 600 सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रफुल्लजी चटकी यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतीय सचिव श्री सुरेशजी डोरले होते.
डॉ. ममता आकुलवार (CGHS) यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. विजय चंदावार यांनी दिनचर्येचे महत्त्व सांगितले, तर दिलीप देवघरे यांनी मनोरंजक पद्धतीने आरोग्यविषयक सूत्रे मांडली. नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डोरले यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर उत्तरवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.


