तालुक्यातील गोरजा येथे झुडपी जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड
१ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दिनांक १८ ला पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मौजा गोरजा येथील झुडपी जंगल परिसरात काही इसम कोंबड बाजार भरवून त्यावर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत आहेत.
मिळालेल्या माहिती वर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान काही इसम कोंबड्यांवर पैशांची बाजी लावताना आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, तर एका आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. घटनास्थळावरून चार दुचाकी वाहने, नगद रक्कम, तीन जखमी कोंबडे, दोन लोखंडी धारदार कात्या असा एकूण १,५६,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल भद्रावती पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यात एकूण पाच आरोपी असून, चौघे फरार आहेत. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे तसेच गुन्हे शोध पथकातील पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, धर्मराज मुंडे, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, अनुप आष्टुनकर, गोपाल आतकुलवार, भारत पुसांडे, खुशाल कावळे, संतोष राठोड, योगेश घाटोडे, किरण चहांदे यांनी यशस्वीपणे पार पाडली.



