२२ जानेवारीला द्वारकानगरी बोर्डा येथे भव्य महायज्ञ
१५१ यज्ञकुंड, ५५१ साधक परिवार ; संत मनीषभाई महाराजांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
राजेंद्र मर्दाने, वरोरा.
वरोरा : श्रीराम मंदिर, अयोध्येच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त द्वारकानगरी, बोर्डा येथे भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. महायज्ञ आयोजन समिती, हनुमान मंदिर द्वारकानगरी बोर्डा, पतंजली योग समिती वरोरा तसेच विविध सेवाभावी संस्था व मंडळांच्या संयुक्त विद्यमाने २२ जानेवारी रोजी सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत हा सामुहिक महायज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.
या महायज्ञात १५१ यज्ञकुंडांमध्ये ५५१ साधक परिवार सहभागी होणार असून संत मनीषभाईजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. हनुमान मंदिर, द्वारकानगरी बोर्डा येथे होणाऱ्या या अध्यात्मिक सोहळ्यासाठी यज्ञ साहित्याचे पॉकेट आयोजकांकडून वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र पूजेचे साहित्य साधकांनी स्वतः आणायचे आहे.
महायज्ञाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांच्या वतीने २० ते २२ जानेवारी दरम्यान सकाळी ५.३० ते ७.०० वाजेपर्यंत निःशुल्क विशेष योग शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
आध्यात्मिक उन्नती, मानसिक समाधान, शारीरिक स्वास्थ्य व सामाजिक सलोखा साधण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब या महायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन महायज्ञ आयोजन समिती, योग मंडळ, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, माहेश्वरी मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ, आनंदम् मैत्री संघ, खैरे कुणबी समाज मंडळ, गायत्री परिवार, स्वामी समर्थ परिवार, धर्मजागरण परिवार, मानवधर्म सेवा समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार वरोरा तसेच गोपाळकृष्ण गृहनिर्माण सहकारी संस्था, बोर्डा यांच्या वतीने करण्यात आले आहे



