गट विकास अधिकारी यांनी सुरू केले मिशन निर्लेखन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वर्गखोल्या निर्लेखन करणे म्हणजे वापरास अयोग्य, धोकादायक किंवा पूर्णतः जीर्ण झालेल्या खोल्यांना अधिकृतरीत्या रद्द ठरविण्याची शासकीय प्रक्रिया होय.असे मत देऊळगाव राजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी 17 जानेवारी रोजी मुख्याध्यापक सभेत व्यक्त करून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
*वर्गखोल्या निर्लेखनाची कारणे* :-
खालील परिस्थितीत वर्गखोल्या निर्लेखन करता येते.
इमारत अतिजीर्ण, पडझडीच्या अवस्थेत असणे
छप्पर, भिंतींना मोठ्या भेगा / गळती
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणे अशा वर्गखोल्यानिर्लेखन बांधकाम अभियंता समवेत संयुक्त स्थळपाहणी केल्यानंतर करता येईल
*निर्लेखनासाठी आवश्यक कागदपत्रे* :-
शाळा प्रमुखांचा प्रस्ताव
स्थळ पाहणी अहवाल ( पंचायत अभियंता ),
फोटो पुरावे (आतले व बाहेरचे)
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) ठराव,इमारतीची माहिती,बांधकाम वर्ष,खोल्यांची संख्या,क्षेत्रफळ,
गटशिक्षणाधिकारी यांची शिफारस या प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले
वर्ग खोल्या निर्लेखन झाल्यानंतर शाळेला अनेक प्रशासकीय, शैक्षणिक, व आर्थिक फायदे होतात, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा फायदा होतो, जीर्ण व धोकादायक खोल्यांचा वापर बंद होतो, अपघात, पडझड याचा धोका टळतो, शाळेची जबाबदारी व कायदेशीर जोखीम कमी होते, नवीन वर्गखोल्या मंजुरी चा मार्ग मार्ग मोकळा होतो,आमदार व खासदार निधी मिळू शकते, शाळा बंद पडण्याचा धोका कमी होतो, असे गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी सांगितले.



