ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास शक्य – अर्चना भोंगळे

कोरपना तालुक्यातील चनई (बू) येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच क्रीडा स्पर्धां घेणे आवश्यक आहे. खेळामुळे मुलांची शारीरिक क्षमता तर वाढतेच, पण मानसिकदृष्ट्याही ते अधिक सुदृढ होतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी क्रीडांगणासारखे दुसरे उत्तम व्यासपीठ नाही.या मैदानातूनच विद्यार्थी भविष्यातील राष्ट्रीय स्तरावरील उत्तम खेळाडू तयार होतील. असे प्रतिपादन अर्चना देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील चनई (बू ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात १५ ते १७ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय बिटस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज (दि.१५) करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना सौ.अर्चना भोंगळे म्हणाल्या, की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट टॅलेंट आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी मैदानात उतरतो, तेव्हा तो केवळ खेळत नसून जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी करत असतो. म्हणूनच क्रीडा संस्कृती जोपासणे ही काळाची गरज आहे. अशा क्रीडा स्पर्धांमुळेच विद्यार्थी उद्याचे सक्षम नागरिक घडत असतात असा आशावाद यावेळी भोंगळे यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चनई (बू) येथील सरपंच रेश्मा मडावी, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड, भाजपा कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, माजी सरपंच अरुण मडावी, उपसरपंच सिद्धार्थ उमरे, पोलिस पाटील वामन खाडे, उमेश पेंदोर, मनोज तुमराम,कार्तिक गोंलावार ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल कोडापे, मदन मोहितकर, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश नांदेकर, बंडू राजुरकर,विनोद जुमडे, विठ्ठल खाडे, शामराव कुमरे, उमेश मडावी, कृष्णा कुमरे, ज्योती कुमरे,कल्पना जीवने,संजय पुरके,सुजाता मडावी, ग्राम पंचायत अधिकारी संजय आडे यांचेसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये