ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागांनी जोगा -काजळी येथे प्रो रेड

एकूण 2 लाख 73 हजारावर विदेशी देशी दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 1 ते 2 दरम्यान मौजा जोगा – काजळी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त श्री गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर क्रमांक 01 व 02 तसेच वर्धा जिल्ह्याचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नागपूर कार्यालयाचे निरीक्षक आनंद पवार व दुय्यम निरीक्षक नितीन गवई, निरीक्षक बालाजी चाळनेवार त्यांचे पथक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा कार्यालयातील निरीक्षक एम ए शेख, दुय्यम निरीक्षक डी वाय राऊत व कर्मचारी हरीदास सुरजुसे अनिल नागमोते गिरीश बावणे एल पी सी सुजाता भारस्करे, आश्विन राठोड यांनी संयुक्त घटनास्थळी जोगा -काजळी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे जाऊन आरोपी क्रमांक (1) गौरव अनिरुद्ध गिरी आरोपी क्र (2) ओमप्रकाश कुंदन यादव यांच्या जवळून रु 2,73,570 चा बनवत देशी व विदेशी दारू निर्मिती साठा जप्त करण्यात आला आहे.

यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथे आरोपी नामे (1) गौरव अनिरुद्ध गिरी वय 28 वर्ष राहणार जोगा -काजळी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा व आरोपी नामे (2) ओमप्रकाश कुंदन यादव राहणार तिघरा तह. जिल्हा सिवनी म.प्र. हल्ली मु.कोढांळी तह.काटोल यांना अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथे अपराध क्रमांक 19/2026 मद्य दारुबंदी कायद्याचे कलम व भारतीय न्याय संहिता 123 अन्वये गुन्हा नोद करण्यात आला व आरोपींना न्यायालय कारंजा घाडगे येथे हजर करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये