ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे क्रीडा महोत्सव, आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या क्रीडा महोत्सव, आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून मा. सचिन मालवी साहेब,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, बल्लारपूर तसेच शाळेच्या प्राचार्या मा. असमा खान मॅडम यांनी विद्येची देवता माता सरस्वती यांच्या फोटोला मलार्पण व दीप प्रज्वलन करून त्यानंतर फित कापून उद्घाटनाचा शुभारंभ केला.

शाळेच्या प्राचार्य असमा खान मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी निर्माण व्हावी तसेच खेळाडू वृत्तीचा विकास व्हावा याविषयी प्रस्ताविकेत सांगितलेले आहे. तसेच क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी मा. सचिन मालवी सर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण गरजेचे आहे तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य जोपासणे खूप महत्त्वाचे आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान अंगीकृत व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक कौशल्य विकसित व्हावे यासाठी आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय सचिन मालवी साहेब यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये