घुग्घुसमध्ये शिवसेना (उबाठा) युवासेना–युवतीसेनेचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर | दिनांक १५ जानेवारी २०२६ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना व युवतीसेना घुग्घुस यांच्या वतीने आज पारंपरिक हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सन्मान, एकतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून किरण संजय देरकर यांनी उपस्थिती लावली. त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिलांचे समाजातील महत्त्व, स्वावलंबन आणि एकोप्याची गरज यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे विधवा महिलांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांना तिळगूळ व वाण देत गौरविण्यात आले, ज्यामुळे सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण झाला.
या प्रसंगी इंजि. चेतन बोबडे, सुरेखा ढेंगळे, वैशाली देठे, मधुकर मालेकर, निशांत ठाकरे, मोनिका अतकारी, नैना ढोके, दुर्गा खोंडे, निशा राम, अस्मिता झाडे, मारुती जुमनाके, राकेश पांघाटे, अमित बोबडे, हर्ष चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, सन्मानाची भावना आणि एकोपा यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला. शिवसेना (उबाठा) युवासेना–युवतीसेनेच्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी मनापासून कौतुक केले.



