ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्या १५ जानेवारी रोजी मतदान ; आज साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत पार

महानगरपालिका निवडणुकीत ५ पिंक व ५ आदर्श मतदान केंद्रांची स्थापना

चांदा ब्लास्ट

३९१ पथकांचे एकुण १५६४ कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने उद्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.मतदानाची वेळ सकाळी ०७:३० ते संध्याकाळी ०५:३० असुन मतदारांना सुरक्षित, सुलभ व आदर्श मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ५ पिंक बूथ व ५ आदर्श बूथ निश्चित करण्यात आले आहेत.

   चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघात २ लक्ष ९९ हजार ९९४ मतदारांसाठी ३५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असुन महिला मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आलेल्या ५ पिंक बूथमध्ये महिला कर्मचारी, सुरक्षित वातावरण, विशेष सजावट व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर आदर्श बूथ हे स्वच्छता, सुव्यवस्थित रचना, योग्य मार्गदर्शन व आदर्श व्यवस्थापनासाठी ओळखले जाणार आहेत.

    दरम्यान, मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वाटप आज मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून करण्यात आले. या प्रक्रियेसाठी सर्व व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली होती. मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रवेश व बाहेर निघण्याची स्वतंत्र व्यवस्था, विविध पथकांची हजेरी नोंद, नाश्ता व चहाची सोय, साहित्य वाटपासाठी स्वतंत्र टेबल्स, संबंधित मतदान बूथची माहिती,पोलीस प्रशासनाची व्यवस्था तसेच मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी असलेल्या बसची स्पष्ट व्यवस्था करण्यात आली होती.या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कुठलाही गोंधळ न होता दुपारी ३ वाजेपर्यंत ३९१ पथकांचे एकुण १५६४ कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले.

   यावेळी मा. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मा. मुख्य निवडणूक निरीक्षक श्री. विजय भाकरे (भा.प्र.से.) यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रशासनाकडून मतदानपूर्व तयारी व साहित्य वाटपाची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना निर्भयपणे, शांततेत व उत्साहात मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे

पिंक बूथ ठिकाणे :

पोलीस कल्याण सभागृह, पूर्व दिशा, खोली भाग – १

एम.बी. प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, माता मंदिर जवळ, कृष्णनगर, खोली क्र. २

चांदा पब्लिक कॉन्व्हेंट, दाताळा रोड, खोली क्र. ५

रफी अहमद किदवई हायस्कूल, उत्तर बाजू, खोली क्र. १

पॅरामाऊंट कॉन्व्हेंट, नेताजी चौक, बाबुपेठ

आदर्श बूथ ठिकाणे :

बी.जे.एम. कार्मेल अकॅडेमी, तुकूम

अमर शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा, खोली क्र. ४, इंदिरानगर

सेंट मायकल कॉन्व्हेंट, रामनगर

अभ्यंकर मनपा प्राथमिक शाळा, गडला मारोती मंदिराजवळ, खोली क्र. १

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, बाबुपेठ खोली क्र. ३

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये