ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

गुणवंत विद्यार्थिनचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत स्थानिक डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयाचा पीजीडीसीए अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून कल्याणी मंडाले ह्या विद्यार्थिनीने सर्वोच्च गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थिनी कल्याणी मंडाले हिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत पाठक, प्रा. नेहा मानकर, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद प्रा. प्रज्ञा बुरडकर, प्रा. प्रीती कंदीकट्टीवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी सीमा हवेलीकर, पूनम काळे आणि नेहा सोरतीकार प्रामुख्याने उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये