शास. औ. प्र. संस्थेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सरदार पटेल महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. धनराज मुरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी गटनिदेशक हितेश नंदेश्वर, बंडोपंत बोढेकर रासेयो कार्यक्रम अधिकारी राजेश श्रीरामे, उपकार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले . डॉ . धनराज मुरकुटे म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी भारतीय संस्कृती, वेदांत, सहिष्णुतेचा विचार जगासमोर मांडून देशाची मान उंचावली, असे ते म्हणाले. संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर यांनीही राजमाता जिजाऊ जयंती संदर्भात समायोचित विचार मांडून संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने सूचना दिल्यात.
सूत्रसंचालन निदेशक निदेशिका अनिता ढेंगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशिका रंजना ढाकणे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.



