जिनियस किड्स अकॅडमीचे नेत्रदीपक यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलअमरावती येथे चॅम्पियन्स ग्रुप च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी 13 व्याआंतरराष्ट्रीय खुल्या अबॅकस अँड वैदिक मॅथ स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विविध अकॅडमीच्या एकूण 2130 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना आठ मिनिटात 100 सांखिक प्रश्नांची उत्तरे देणे हे होय. काम जरी कठीण असले तरी ते साध्य करून घेणे शिक्षकांचे काम असते. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून गणिता विषयी आवड निर्माण करतो व नियमित सरावाने वेग आणि अचूकता वाढवतो व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवतो.
या स्पर्धेत जीनियस किड्स अकॅडमी,रामनगर वर्धाचे 77 विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यापैकी 17 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त करून ग्रँड मास्टर पुरस्कार पटकावला.
38 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, 7 विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, 9 विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार तर 6 विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धेनंतर पुरस्कृत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जीनियस किड्स अकॅडमी,वर्धा ला सर्वोत्कृष्ट फ्रेंचाईजी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई- वडील, जीनियस किड्स अकॅडमीच्या संचालिका व अबॅकस शिक्षिका पूजा बकाले, शिक्षिका वंदना ढाले, शिक्षिका पूजा गुंडावार यांना दिले.



