राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात योग प्रशिक्षण शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज, गडचांदूर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आसन या गावामध्ये तीन दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले, त्यापैकी योगा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.
या उपक्रमासाठी सनराईस योगा ग्रुप च्या टीमला आमंत्रित करण्यात आले होते. या टीमच्या माध्यमातून गावकरी , शिक्षकवृंद तसेच ज्युनियर कॉलेज चे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी मोठ्या उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने योग प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.
या प्रसंगी शरद पवार कॉलेज, येथील समाजशास्त्र विषयाच्या प्रा. माया मसराम मॅडम, आणि सनराईस योगा वूमन्स ग्रुप च्या संचलिका कुंतल चव्हाण यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य कसे सुधारते, तणाव कसा कमी होतो तसेच एकाग्रता आणि सकारात्मक जीवनशैली कशी निर्माण होते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अर्चना घोटकर, भारती राठोड, वैशाली पारधी, अंजू विश्वास, माधुरी चटारे, अनिता केराम, वैशाली पारधी, मंदा वडस्कर, पल्लवी इंगोले, पल्लवी रोहने, चंदा,राखून्डे यांनी योगा प्रशिक्षण देऊन तसेच इतर सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा योग प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी, प्रा. प्रदीप परसूटकर, प्रा. सुधीर थिपे, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा. चेतना कामडी, प्रा. संगीता गिरी, शिक्षकवृंद, गावकरी यांनी सनराईस योगा ग्रुपच्या टीमचे आभार मानण्यात आले आणि योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.



