श्री गिरनार उपसर्ग विजेता श्री 108 प्रबल सागर जी गुरुदेव यांचे मंगलमय आगमन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दिगंबर जैन समाजाचे धर्मगुरू व श्री गिरणार उपसर्ग विजेता श्री 108 प्रबलसागर जी महाराज यांचे देऊळगाव राजा नगरीमध्ये दिनांक 13 जानेवारी 26 रोजी सकाळी आठ वाजता मंगलमय आगमन होणार आहे.
त्यांच्या स्वागताची जैन समाजाचे वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. त्यांनी मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथून विहारास सुरुवात केली आहे ते पुढे शिरपूर तीर्थक्षेत्र येथे जाणार आहेत ते पायी दररोज 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास करत आहेत जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे गिरणार तीर्थक्षेत्र येथे काही अजैन समाजकंटकाकडून काही वर्षांपूर्वी आक्रमण करण्यात आले होते.
त्यावेळी श्री 108 प्रबलसागर जी महाराज गंभीर जखमी झाले होते तेव्हापासून त्यांना भारतातील जैन समाजाने श्री गिरनार उपसर्ग विजेता म्हणून घोषित केले आहे त्यांच्या सेवेसाठी शहरातील दानशूर प्रमोद मगनसा महाजन, मंदिरचे ट्रस्टी मुकेश सिंगलकर, राहुल महाजन परिश्रम घेत आहे,



