सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथ्रीकर राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने आयोजित भव्य समारंभात अखिल भारतीय मराठा सेवा संघा तर्फे सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथ्रीकर यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कार्याची दखल घेऊन राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .शाल, श्रीफळ, सन्मान पत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ह. भ. प. वासुदेव महाराज महल्ले यांचे शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी ह भ प डॉ. शंकर बोर्डे,डॉ. प्रा. ममता इंगोले (महल्ले) व अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गजानन हरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या सफलते साठी प्रा. दादाराव पाथ्रीकर, मोरे महाराज, सौ. हरणे यांनी प्रयत्न केलेत. सौ. प्रतिभा पाथ्रीकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.



