खो खो व कबड्डीचे विशेष क्रीडा प्रशिक्षण शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :_ अंबुजा फाउंडेशन उप्परवाही येथे शिक्षकांसाठी खो-खो व कबड्डी या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकारांचे विशेष क्रीडा प्रशिक्षण12 व 13 जानेवारी रोजी यशस्वीपणे घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांमध्ये क्रीडाविषयक कौशल्य विकसित करणे तसेच शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना खो-खो व कबड्डी खेळाचे योग्य व शास्त्रीय प्रशिक्षण देता यावे, हा होता.
या प्रशिक्षणादरम्यान खो-खो व कबड्डी खेळांचे नियम, खेळातील तांत्रिक बाबी, संघ रचना, बचाव व आक्रमण पद्धती, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना तसेच खेळातील सुरक्षितता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दोन्ही खेळांतील विविध कौशल्ये प्रभावीपणे समजावून सांगितली.
सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढला असून ते आता विद्यार्थ्यांना खो-खो व कबड्डी खेळ शिकवण्यासाठी अधिक सक्षम झाले आहेत. या उपक्रमामुळे शाळांमध्ये क्रीडाविषयक सकारात्मक वातावरण निर्मितीस मदत होईल तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक अशा सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.l
अंबुजा फाउंडेशनने शिक्षकांसाठी आयोजित केलेले हे खो-खो व कबड्डी क्रीडा प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले असून अशा उपक्रमांमुळे शिक्षणासोबतच क्रीडेलाही योग्य महत्त्व मिळत आहे.
या प्रशिक्षणाला उपस्थित प्रशिक्षक दाणी स्पोर्ट्स फाउंडेशन चे विजय कुमार सर, अंबुजा फाऊंडेशन च्या असोसिएट डायरेक्टर शुभांगी सोहनी मॅडम, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर सरोज अंबागडे मॅडम, पी.इ ट्रेनर मोहित साखरे, कम्युनिटी मोबेलायझर हर्षाली खारकर आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.



