ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुकास्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा थाटात संपन्न

पं.स.(शिक्षण विभाग) सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग द्वारा आयोजित सत्र २०२५ – २०२६ यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्याहाड खुर्द येथे नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेचे उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात आयोजन करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती सावलीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे तर अध्यक्षस्थानी शाळा समितीच्या अध्यक्षा उरकुडे होत्या.तसेच मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी किशोर बारसागडे,केंद्र प्रमुख किशोर येनगंटीवार,राजेंद्र रक्षणवार,किशोर आनंदवार, लोमेश बोरेवार,दीपक राऊत,जीवन भोयर,अनिल अवसरे उपस्थित होते.

नवरत्न स्पर्धा ही प्राथमिक आणि माध्यमिक गटामध्ये घेण्यात आली त्यात कथाकथन स्पर्धा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा,वादविवाद,एकपात्री भूमिका,बुद्धी मापन स्पर्धा,चित्रकला, सुंदर हस्ताक्षर,स्वयंस्फूर्त लेखन आणि स्मरणशक्ती स्पर्धा अशा ९ स्पर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या त्यात एकूण १६२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला.नवरत्न स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक राजेंद्र शिंदे, तर आभार प्रमोद भोयर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे,विस्तार अधिकारी किशोर बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्र प्रमुख,गट साधन केंद्रातील सर्व साधनव्यक्ती,केंद्रातील सर्व विशेष शिक्षक, व्याहाड खुर्द येथील मुख्याध्यापक रुपचंद थोरात व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये