ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणारा सराईत गुन्हेगार अनिकेत कांबळे यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   माननीय श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारू ची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 07 जानेवारी 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सराईत गुन्हेगार नामे अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा, तह. समुद्रपुर याचेवर रेड केला असता, त्याचे घरी त्याचेकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे, रा. वार्ड क्र 01 उबदा हा हजर मिळुन आला असुन, आरोपी अनिकेत कांबळे व त्याचे घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याचे घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव,सुंगधीत तंबाखु व गुटखा,खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅन्ड पॅकिजींग इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु व गुटखा तसेच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचे व त्याची निर्मिती करण्याकरीता उपयोगी येणारे साहित्याचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचे ताब्यातुन 13 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूच्या 1,300 सिलबंद शिशा, एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या 65 सिलबंद शिशा, विमल, व्हि.1, होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचे पॉकिटे, रासायनिक द्राव्य व बनावटीकरीता उपयोगी येणाऱ्या मशिनासह जु.कि. 4,53,109 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी व भारतीय न्याय संहिता चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, पो.अं अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे,अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये