ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ 

मा. निवडणूक निरीक्षकांची मतदान केंद्रांना भेट

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मा. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री. संजय आसवले यांनी दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली.

  येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ३५५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी मातोश्री विद्यालय,बीजेएम कार्मेल ऍकेडमी,खत्री महाविद्यालय इत्यादी मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्था, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी, मतदान केंद्रांची स्वच्छता, सुरक्षितता तसेच निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

   मा. निरीक्षकांनी निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भीडपणे पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे, तसेच मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश दिले. चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून, सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये