श्री. प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री. प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदा येथे प्रेरणादायी व विचार प्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता व सामाजिक न्यायाच्या कार्याला उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. अनिल मुसळे साहेब यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून क्रांतीज्योती फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत शिक्षणाचा प्रकाश घराघरात पोहचवून समाजाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढणाऱ्या सावित्रीबाई चे कार्य आजही प्रेरणादायी आहे .त्यांच्या विचारातून समता, न्याय व मानवतेची शिकवण मिळते .त्यांचा आदर्श घेऊन शिक्षण, समानता व सामाजिक परिवर्तना साठी सदैव कार्यरत राहावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. दुर्योधन सर, प्रा. बांगडे सर, प्रा. दूमोरे सर प्रा. निता मुसळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रा. संगीता बल्कि यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. तसेच वर्ग अकरावीची विद्यार्थिनी स्नेहल राजूरकर हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तसेच कु. अनुष्का कुइटे,कु.मानसी खिरटकर व पवन रत्ने या विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत भाग घेतला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. नीलिमा हजारे, प्रास्ताविक प्रा. श्री प्रकाश लालसरे सर तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. श्री रत्नाकर बोबाटे सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी बुरान ताई, कांबळे भाऊ तसेच आत्राम भाऊ यांचे सहकार्य लाभले.



