ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय पिंपळगाव बुद्रुक येथे स्नेहसंमेलन 2026 चे हर्षोल्लासात उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलीत श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ट कला महाविद्यालय पिंपळगाव बुद्रुक तालुका देऊळगावराजा येथे स्नेह संमेलनाचे उद्घाटन मोठया थाटात संपन्न झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेटे होते हे होते तर उद्घाटक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री अरविंद भाऊ शिंगणे हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री मुसदवाले होते. सर्वप्रथम माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मानवंदना दिली.

त्यानंतर चित्रकला व हस्तकला प्रदर्शनीचे उद्घाटन श्री मुसदवाले यांच्या हस्ते झाले तर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अरविंद भाऊ शिंगणे यांच्या हस्ते झाले, सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत गीत, विद्यार्थ्यांचे सामूहिक गीत, गणपती नृत्य, टाळकरी नृत्य व देशभक्तीपर नृत्य हे तीन सांस्कृतिक कार्यक्रम पाहुण्यांसाठी दाखवण्यात आले, त्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री सुरळीकर सर यांनी केले त्यामध्ये शाळेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रम व परीक्षा यांचा लेखाजोखा सादर केला.

प्रमुख मार्गदर्शक श्री मुसदवाले यांनी विद्यार्थ्यांना अतिशय उद्बोधक मार्गदर्शन भावी जीवनाच्या दृष्टीने केले ,श्री रामकृष्ण दादा शेटे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना शाळेच्या प्रगती विषयी व विविध उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करीत सर्वांचे अभिनंदन केले.

उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री सहदेवरावजी सुरडकर, श्री अशोक भाऊ कोटेचा तसेच स्थानिक सल्लागार श्री कारभारी जी नागरे, सौ जनाबाई काकड व श्री रामदास वाघ हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन स्नेहसंमेलन प्रमुख श्री इलग सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संदीप मुंडे सर यांनी केले एकंदरीत अतिशय आनंदी वातावरणात उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये 100 मीटर धावणे, पोत्याची शर्यत तीन पायाची शर्यत, एक मिनिट शर्यत व कबड्डीचे अंतिम सामने घेण्यात आले क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन स्थानिक सल्लागार श्री कारभारी नागरे यांच्या हस्ते करण्यात आले अशा तऱ्हेने अतिशय आनंदी वातावरणात आजचे सर्व कार्यक्रम संपन्न झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये