निळकंठराव शिंदे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपप्राचार्य, डॉ. अपर्णा धोटे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण जुमडे, सौ. सुकेशीनी भवसागर, कु. रोशनी जॉन, कु.आकांक्षा आवारी इत्यादी प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून झाली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणातून डॉ. किरण जुमडे यांनी कार्यक्रम आयोजन करण्यामागची प्रमुख भूमिका विशद करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला
कुमारी रोशनी जॉन मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री पुरुष समानता हा दृष्टिकोन विशद केला.
कुमारी आकांक्षा आवारी मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण विषयक दृष्टिकोन विशद केला. सुकेशीनी भवसागर, यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर विस्तृत प्रमाणात प्रकाश टाकला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डॉ.अपर्णा धोटे यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीला ज्योतिबा फुले यांची साथ मिळाल्यामुळे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाकरिता शाळा उघडून मुलीच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या व विषम परिस्थितीचा सामना करून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला हे आजच्या नवीन पिढीने समजून घेणे आवश्यक आहे असे मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुलदीप भोंगळे व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीणकुमार नासरे यांनी केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी व संख्येने उपस्थित होते



