शिक्षक परिषदेच्या पाठीशी सदैव उभे राहू : आमदार करण देवतळे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या, मागण्या त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांप्रती समर्पित एकमेव अग्रेसर संघटना असून तिच्या पाठीशी सदैव उभे राहू असे स्पष्ट मत महाराष्ट्र विधानसभा सदस्य करण देवतळे यांनी शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग चे दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम प्रसंगी संघटना प्रतिनिधी यांचे समोर व्यक्त केले. आमदार करण देवतळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना खनिज विकास निधीतून ई-लर्निंग संच उपलब्ध करून दिले. त्याबद्दल राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांचे हस्ते आमदार करण देवतळे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही संघटना विशिष्ट ध्येयाने प्रेरित संघटना असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताठ मानेने उभे राहण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी प्रयत्न करून ‘आमचे गाव, आमचीच शाळा ‘ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी उपस्थित संघटना पदाधिकारी यांना केले.
शाळांमध्ये वाढते आँनलाईन कामे त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेकडे होत असलेले दुर्लक्ष त्याचप्रमाणे अपूरी शिक्षक संख्या याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे जिल्हाध्यक्ष विलास खोंड यांनी आमदारांचे लक्ष वेधले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल देठे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, संचालन संघटना प्रतिनिधी रंगनाथ मत्ते, आभार प्रदर्शन विलास खाडे जिल्हा कार्यवाह चंद्रपूर यांनी केले.
स्वागत गीत दिगंबर खुळसंगे यांनी गायले.
यावेळी संघटना प्रतिनिधी सर्वश्री विकास घागी, सुरेश येन्नावार, ऋषी मेश्राम यांचा सत्कार आमदार करण देवतळे यांनी केला.
स्मरणिका दिनदर्शिका प्रकाशनाचा परिषदेचे हे सातवे वर्ष आहे. राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून सुरू केलेली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही संघटना राज्यभरात पोहचली असून त्याचे नेतृत्व राज्य कार्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर , राज्य कार्यवाह संजय पगार राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांचे मार्गदर्शनाखाली करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांनी कार्यक्रमप्रसंगी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला विलास बोबडे विभाग कार्यवाह,अजय बेदरे जिल्हा कोषाध्यक्ष, विजयालक्ष्मी पुरेड्डीवार जिल्हा कार्याध्यक्ष यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र पांडे, सतीश दुवावार, दिलीप राठोड, सतीश डांगरे, आनंद वेलादी, नरेंद्र चौखे, सुनील टोंगे,सतीश डांगरे, विकास घागी, किरण लांडे,संचित जांभूळे, विनोद बाळेकरमकर, संदीप गराटे, स्वप्नील लुथडे आदी संघटना पदाधिकारी प्रयत्नशील होते.



